वाढदिवसा निमित्ताने आश्रमातील बांधवांना फळांचे वाटप
खारेपाटण (प्रतिनिधी): राजेश जाधव हे विरार येथे निवासी असलेले एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. नालासोपारा पुर्व येथील डाँ.गायधनकर यांच्या सिध्दीविनायक हाँस्पिटल मधे ते कार्यरत आहेत. माणुसकी फौंडेशन संस्थेचे ते सचिव असून समाजातील उपेक्षितांसाठी कार्य करणा-या विविध स्वयंसेवी संस्थाशी सबंधीत असलेले राजेश हे सामाजिक चळवळीतील एक तरूण कार्यकर्ते आहेत. सामाजिकतेची जान असलेल्या राजेश जाधव यांनी त्यांचा ४८ वा वाढदिवस नुकताच जीवन आनंद संस्थेच्या विरारफाटा – वरठापाडा येथील समर्थ आश्रमात बांधवांना फळे वाटप करून व आश्रमसाठी आवश्यक किराणा सामान प्रदान करून साजरा केला. गेली सलग ४ वर्षे राजेश जाधव हे समर्थ आश्रममधील बांधवांसह वाढदिवस साधेपणाने साजरा करीत आहेत. आश्रमातील कार्यकत्यांनी व बांधवांनी राजेश यांना औक्षण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राजेश यांचे सोबती व माणुसकी फौंडेशन संस्थेचे अध्यक्ष घनःशाम आंबोकर, सामाजिक कार्यकर्ते राजु शेवंते, माणुसकी फौंडेशनचे खजिनदार विजय गोडबोले व समर्थ आश्रमचे भाईदास माळी, दिपाली मेघा-माळी, हेमलता पवार,चंदा छेत्री यांचेसह संस्थेचे विश्वस्त किसन चौरे उपस्थीत होते.















