कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उ.बा.ठा. सेनेचे पुरळ ग्रामपंचायत सदस्य बाळू रत्नाकर मुळम यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. राणे यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी मुळम यांनी भाजपात प्रवेश केला.यावेळी देवगड पंचायत समिती माजी उपसभापती श्री.रवींद्र तिर्लोटकर,श्री.संदीप देवळेकर शक्ती केंद्रप्रमुख पुरळ, श्री.संतोष पुजारे बूथ प्रमुख उर्शी, व महेश वानिवडेकर उपस्थित होते.













