चौके ( अमोल गोसावी ) : धामापूर मोगरणे येथे ग्रामपंचायत धामापूर च्या १५ व्या वित्त आयोगांतर्गत व्यवसाय कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत नागरिक बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान च्या वतीने मोगरणे निकमवाडी , फोपळेवाडी , महाजनवाडी येथील बचतगटातील महिलांना कुक्कुटपालन व विविध प्रकारचे मसाले बनविणे याविषयी प्रशिक्षण देउन मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित महिलांना प्रशिक्षक अनिल गावडे यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी सरपंच मानसी परब , उपसरपंच रमेश निवतकर , ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गावडे , अस्मिता फोपळे , सामाजिक कार्यकर्ते अविनाश निकम , बाळकृष्ण निकम , वर्षा सुतार , भवानी बचतगट निकमवाडीच्या अध्यक्षा हर्षदा सडवेलकर , सचिव वैशाली गावडे , लक्ष्मी बचतगट फोपळेवाडीच्या प्रतिभा फोपळे , नम्रता फोपळे , स्वामी समर्थ बचतगट महाजनवाडीच्या सुरेखा आमरे , दिपीका झोरे , यांच्या सह बचतगटातील इतर महिला उपस्थित होत्या. यावेळी सरपंच मानसी परब यांनी उपस्थित महिलांना कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले आणि व्यवसाय उभारणीसाठी ग्रामपंचायत तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. यावेळी सरपंच मानसी परब यांच्या हस्ते नागरिक बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान चे प्रशिक्षक अनिल गावडे यांच्या सत्कार करण्यात आला.
धामापूरात बचतगटाच्या महिलांना व्यवसाय कौशल्य विकास प्रशिक्षण












