मोठी बातमी ! शिवसेना उबाठा आमदार राजन साळवींच्या घरावर लाचलुचपत खात्याचा छापा

राजापूर (प्रतिनिधी) : राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) पथकाचे छापे, गेले वर्षभर आ. साळवी यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी सुरु होती. आ. साळवी, त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ यांचीही यापूर्वी चौकशी करण्यात आली आहे गेल्या चौकशीच्या तारखेनंतर अ. साळवी यांनी आपण पुन्हा चौकशीला उपस्थित राहणार नाही अशी भूमिका घेतली होती त्यानंतर आज ताचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रत्नागिरीतील घरावर छापे घातले छाप घातला तेव्हा आ. साळवी घरी अनुपस्थित होते, मात्र कालांतराने ते हजर झाले त्यांच्या हॉटेलमध्ये सुद्धा पथक पोहोचले आपण सहकार्य करणार असल्याची भूमिका आ साळवी यांनी घेतली आहे.

error: Content is protected !!