चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने श्रमदानातून बांधला बंधारा….!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर पालकरवाडी, गावठणवाडी या भागातील वाहणाऱ्या ओहोळावर चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी एकत्र येत आज बंधारा बांधला. या मुळे उन्हाळ्यात जाणवणारी पाण्याची टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. बंधारा बांधल्या मुळे विहिरीची पातळीत वाढ होऊ शकते तसेच उन्हाळी शेतीसाठीही पाण्याचा उपयोग होऊ शकतो.

यावेळी चिंदर सरपंच, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, शिक्षक- रतन बुटे, राजेंद्र चौधरी, भीमाशंकर शेतसंदी, राजेंद्रप्रसाद गाड, प्रवीण तेली, गोपाळ पालकर, राजू पालकर, प्रिया पालकर, रणजित दत्तदास, सुमित कानविंदे, सिद्धेश नाटेकर, विश्राम माळगावकर तसेच शाळा चिंदर नंबर 1 चे, बहुसंख्य विद्यार्थी सहभागी होते.

error: Content is protected !!