श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना निमित्त लोरे नं १ गांगोचाळा मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : २२ जानेवारी होणाऱ्या अयोध्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या निमित्त श्री देव गांगोचाळा मंदिर लोरे नं १ येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ०९.०० वा श्रींची व प्रभु श्री रामांच्या प्रतिमेचे पुजन व अभिषेक, सकाळी १०.०० वा अर्थर्वशीर्ष व रामरक्षापठण, दुपारी १२.०० वा महाआरती, दुपारी ०१.०० वा महाप्रसाद, सायं. ०७.०० वा दिपोत्सव, सायं. ०८.०० वा बुवा विनोद चव्हाण यांचे सुश्राव्य भजन अशी कार्यक्रमाची रूपरेषा असून या सर्व कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती लोरे नं १ ग्रामस्थांनी केली आहे.

error: Content is protected !!