मालवण पॉलिटेक्निक येथे ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग अभियानांतर्गत मार्गदर्शन !

मसुरे (प्रतिनिधी) : शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग या मोहिमेअंतर्गत मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमादरम्यान प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांची भयानकता समजावून सांगितली. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक श्री प्रकाश शिरहट्टी व सह समन्वयक डॉ योगेश महाडिक यांनी संस्थेतर्फे आभार मानले.

error: Content is protected !!