म.रा.प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग जिल्हा चे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग शाखा कणकवली यांचे वतीने सन – २०२३-२४ या शैक्षणिक वर्षी घेण्यात आलेल्या इयत्ता – ५ वी शिष्यवृत्ती सराव परीक्षा नुकतीच जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत संपन्न झाली.या सराव परीक्षेचे उद्घघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर यांचे शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
या कार्यक्रमाला खारेपाटण केंद्र शाळा नं.१ चे उच्चश्रेणी मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर,खारेपाटण शिष्यवृत्ती सराव परीक्षा केंद्र संचालक कुबल सर, नडगिवे जि.प.शाळा क्र.१ व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष साक्षी आंबेरकर,जि.प.शाळा चिंचवली शा.व्य.स.सदस्य दत्तात्रय भालेकर,जि.प.शाळा शेर्पे च्या सहायक शिक्षिका आमरीन शेख,खारेपाटण केंद्र शाळेचे शिक्षक कोंडविलकर सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी संतोष पाटणकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.की,म. रा. प्राथमिक शिक्षक समितीच्या आयोजित शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक करून शिष्यवृत्ती सराव परीक्षेस बसलेल्या शालेय विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.व सराव परीक्षेच्या माध्यमातून अधिक गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक समिती जे प्रयत्न करत आहे.त्यातून आपला सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक शेत्रात सर्वाधिक गुणवत्ता यादीत अव्वल राहणार आहे.
केंद संचालककुबल सर यांच्या वतीने मान्यवर उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर खारेपाटण केंद्र शाळा येथील शिष्यवृत्ती सराव परीक्षा केंद्राला म.रा.प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली तालुका अध्यक्ष टोनी म्हापसेकर जिल्हा उपाध्यक्ष अजय तांबे,कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कुडलकर यांनी सदिच्छा भेट देऊन परीक्षा केंद्राची व शाळेची पाहणी केली.शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी त्यांचे स्वागत केले.
खारेपाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत खारेपाटण व शेर्पे केंद्राच्या सुमारे २७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या सराव परीक्षेत अनुक्रमे उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या ३ विद्यार्थ्यांना म.रा. प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन खारेपाटण केंद्र शाळेच्या सहायक शिक्षिका श्रीम.रेखा लांघी यांनी केले तर प्रास्ताविक केंद्र संचालक श्री कुबल सर यांनी केले. शेवटी सर्वांचे आभार शाळेचे मुखाद्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी मानले.