खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशीतील खारेपाटण,चिंचवली, वायगणी,नडगिवे,शेर्पे,कुरगवणे,बेर्ले इत्यादी गावातील सकल मराठा समाज बांधवांचा स्नेहमेळावा उद्या रविवार दी.२१ जानेवारी २०२४ रोजी खारेपाटण हायस्कूलच्या कै.चंदकांत पारीसा रायबागकर सभागृहात सकाळी १०.०० वाजता खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाज बांधव समितीचे अध्यक्ष रमकांत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी गट विकास अधिकारी वासुदेव नाईक, कणकवली सहाय्यक गट विकास अधिकारी सूर्यकांत वारंग,खारेपाटण ग्रा.पं.सदस्य गुरुप्रसाद शिंदे तसेच समिती अध्यक्ष रमाकांत राऊत, उपाध्य श्रीकांत भालेकर,सचिव – ऋषिकेश जाधव,खजिनदार – प्रताप फाटक,सहसचिव सुबोध देसाई, आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने इयत्ता १०वी/१२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच ग्रा.पं.सदस्य,पोलीस पाटील व तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांचा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तर या मेळाव्यात बिझनेस पीपल संस्थेतर्फे सारथी च्या विविध योजनांची माहिती यावेळी समाज बांधवांना देण्यात येणार आहे.यावेळी समाजातील कर्तुत्वान महिलांचा देखील सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाज बांधव खारेपाटण पंचक्रोशी समितीचे सचिव ऋषिकेश जाधव यांनी दिली.तरी या कार्यक्रमाला खारेपाटण पंचक्रोशीसह दशक्रोशोतील सकल मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समिती अध्यक्ष रमाकांत राऊत यांनी केले आहे.












