पळसंब जयंतीदेवी मंदिर येथे २२ रोजी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम !

आचरा (प्रतिनिधी) : श्री आई जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान पळसंब आणि ग्रामपंचायत पळसंब यांच्या वतीने श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे होणाऱ्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त श्री जयंती देवी मंदिर पळसंब येथे २२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त श्री दुर्गा विष्णू याग सह सकाळी ८.०० वा.गणपती पूजन, सकाळी ८.१५ ते ११.४५ लघुरुद्र जप अभिषेक हवन आणि पूर्णाहुती, सकाळी ११.४५ ते १२.१५ सामूहिक नामजप, दुपारी १२.१५ ते १.०० नैवेद्य आरती आणि मंत्रपुष्प,दुपारी १.०० ते २.०० महाप्रसाद दुपारी ३.०० ते ५.०० गावातील महिलांसाठी हळदी कुंकू फुगडी आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम, सायं. ६.०० मंदिर परिसरात दिव्यांची आरास, सायं. ७.०० आरती आणि ग्रामस्थांचे भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थिती चे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!