चिंचवली येथे राम मंदिर उद्घघाटन निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न…

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील चिंचवली या गावी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर उद्घघाटनाच्या निमित्ताने व प्रभू श्री रामाच्या मुर्ती प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त येथील ग्रामदैवत श्री निनुदेवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी येथील निणुदेवी मंदिरात अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतिमेचे भक्तीभावाने पूजन करण्यात आले.यानंतर पुरोहितांच्या हस्ते विविध धार्मिक विधी संपन्न झाल्यावर ग्रामस्थांनी खणा नारळाने देवीची ओटी भरली.या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामस्थानी आपली सुस्वर भजने सादर केली. रामलल्ला मुर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त चिंचवली येथील सर्व ग्रामस्थाना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.याचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घेतला.या सर्व विविध कार्यक्रमांनी चिंचवली गावातील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.

error: Content is protected !!