वासंती पाध्ये यांचे निधन
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील बेळणे येथील वासंती नारायण पाध्ये यांचे शनिवारी (२० जाने) राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९० वर्षांच्या होत्या. हसतमुख, शिस्तप्रिय, निर्भय, दानी व स्वागतोत्सुक असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. पती कै.नारायण ऊर्फ आप्पा पाध्ये यांच्यासमवेत त्यांनी १९९२ च्या अयोध्या येथील कारसेवेत सहभाग घेतला होता. संघपरिवारामुळे त्यांच्याकडे सतत माणसांचा राबता असे.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. कणकवली येथील पाध्ये मेडिकलचे संजय पाध्ये व राजीव पाध्ये यांच्या त्या मातोश्री होत. बेळणे येथील स्मशानभूमीत रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.












