उपरकर कुटूंबियांचा भवानी मातेचा त्रैवार्षिक गाेंधळ 26 जानेवारी राेजी

कणकवली (प्रतिनिधी) : उपरकर कुटुंबियांचा श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव शुक्रवार दि. २६ जानेवारी रोजी कणकवली तेलीआळी येथील श्री भवानी मंदिर येथे संपन्न हाेणार आहे. त्यानिमत्त धार्मिक कार्यक्रम हाेणार आहेत.

शुक्रवार 26 राेजी सायंकाळी ५ वाजता सालाबादप्रमाणे प.पू.अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पादुकांचे दर्शन,रात्रौ ७ वा.श्री भवानी मातेच्या गोंधळ उत्सवास सुरूवात,रात्रौ ९ वा. गोंधळाचा मांड व महाप्रसाद, शनिवार दि.२७ राेजी दुपारी ३ वा.श्री सत्यनारायणाची महापूजा-तिर्थप्रसाद,सायं.५ वा.महिलांसाठी हळदीकुंकू तसेच रात्रौ ८ वा. डबलबारी भजनाचा जंगी सामना हरकुळ-बुद्रुक येथील बुवा अभिषेक शिरसाट विरुद्ध पावशी-कुडाळ येथील बुवा अरुण घाडी यांच्यात हाेणार आहे. कार्यक्रमांचा व तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन उपरकर कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!