ग्रा. पं. शिपाई राजेंद्र लाड यांना दिला तिरंगा ध्वज फडकविण्याचा मान
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत मध्ये यावर्षी प्रथमच आज २६ जानेवारी २०२४ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनी गावचे सरपंच श्री संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने समाजाला एक वेगळा आदर्श घालून दिला असून आपल्याच ग्रामपंचायत कार्यालयातील शिपाई कर्मचारी श्री राजेंद्र दिनकर लाड यांना तिरंगा फडकविण्याचा सन्मान देण्यात आला.व प्रथमच एका शिपाई कर्मचारीच्या शूभहस्ते भारतीय ध्वज फडकविण्यात आला.तर कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायत ने घेतलेल्या या निर्णयाचे व एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला दिलेल्या सन्माननाचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
या कार्यक्रमाला सरपंच पप्पू ब्रम्हदंडे,उपसरपंच बबलू पवार, ग्रा.पं.सदस्य बाबला गोसावी, रवींद्र पवार, स्नेहा गोसावी, सारिका कुडाळकर,अक्षता सादीकले,विशाखा राऊत, तंटामुक्त समिती अध्यक्ष भालचंद्र लाड, माजी सरपंच बाळा राऊत, संजय लाड ग्रामसेवक गिरीश धुमाळेआदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच ग्रामस्थ नारायण कदम,प्रवीण कुडाळकर, बाबू गोसावी,अंकुश सादीकले,सचिन कदम,अनिल गोठणकर,सदानंद कुडाळकर,तसेच शिक्षक श्री बागडी सर,वावदाणे सर,झाटे सर गर्जे सर व सर्व शाळांचे विद्यार्थी शिक्षक यावेळी उपस्थित होते.
गेली २५ वर्षे आमच्या कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायतीची व गावाची प्रामाणिकपणे सेवा करणारे शिपाई कर्मचारी राजेंद्र दिनकर लाड यांना ध्वज फडकविन्याचा मान द्यावा असे मला सारखे वाटत होते. व आज माझा ध्वज फडकविण्याचा बहुमान असताना देखील तो सन्मान मी आजच्या प्रजासत्ताक दिनी आमचे ग्रा.पं.शिपाई कर्मचारी राजेंद्र लाड देत असल्याचा आम्हाला व आमच्या गावाला सार्थ अभिमान असल्याचे यावेळी गावचे सरपंच पप्पू ब्रह्मदंडे यांनी सांगितले.












