कोल्हापुरच्या महिलेवर सिंधुदूर्गमध्ये नेऊन केला बलात्कार ; शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

काेल्हापुर (प्रतिनिधी) : पती व मुलास ठार मारण्याची धमकी देऊन गॅस वितरण रिक्षावर काम करणाऱ्या तरुणाने विवाहितेस कोल्हापुरातून नेऊन सिंधुदूर्गमध्ये बलात्कार केला. २ ते २५ जानेवारी,२०२४ या कालावधीत हा प्रकार घडली. पिडीत महिलेने सुटका करून घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयीत नितेश सिध्दराम खंणगावकर (रा.सांगवडे ता. करवीर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. २ जानेवारी, २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता संशयित नितेश गॅस सिलेंडर देण्यासाठी या महिलेच्या घरात गेला, ‘तू मला पाहिले आहेस, तू मला नाही म्हटलेस तर मी जीव देणार’ असे म्हणून त्या महिलेस धमकावले. जर तुझ्या घरातील लोकांना याबाबत काही सांगितलेस तर तुझ्या मुलास उचलून नेऊन ठार मारणार, माझ्या मित्रांच्या मदतीने तुझ्या पतीचा खून करणार अशी धमकी देऊन तो निघून गेला.

त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता नितेश खंणगावकर महिलेच्या घरात आला. दरवाजा वाजवल्यानंतर महिलेने दरवाजा उघडला. ‘तू आत्ताच्या आता माझ्या सोबत चल नाहीतर ,तुझ्या मुलास उचलून नेणार ठार मारणार’ अशी धमकी दिली. त्याला घाबरून ती विवाहिता त्याच्यासोबत निघून गेली. सिधुदूर्ग जिल्ह्यातील जामसंडे गावात भाड्याने खोली घेऊन या ठिकाणी महिलेस ठेवले व तिच्यावरी वेळोवेळी अत्याचार केल्याचे पिडीतेने पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

error: Content is protected !!