कणकवली (प्रतिनिधी) : अतिउच्चदाब उपकेंद्रामधून निघणाऱ्या ३३ के. व्ही. मेन बसवरील तांत्रिक देखभाल-दुरुस्ती कामामुळे कणकवली, सांगवे, असलदे आणि फोंडाघाट या चार उपकेंद्रांचा विद्युत पुरवठा २९ जानेवारी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. संबंधित काम निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास विद्युत पुरवठा लवकर चालू करण्यात येईल. तरी कृपया वरील उपकेंद्रावरून वीज पुरवठा होणाऱ्या सर्व वर्गवारीतील लघु व उच्चदाब वीज ग्राहकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे महावितरणचे आवाहन आहे.
कणकवली, सांगवे, असलदे, फाेंडाघाट उपकेंद्रचा विद्यूत पुरवठा 29 जानेवारी राेजी दिवसभर असणार बंद











