सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली आहे. याबाबतचे आदेश आज त्यांना उशिरा प्राप्त झाले. अद्याप पर्यंत या ठिकाणी कोणताही अधिकारी देण्यात आलेला नाही. श्री. अधिकारी हे सहा महिन्यांपूर्वी या ठिकाणी आले होते, तत्पूर्वी त्यांनी दोडामार्ग येथे निरीक्षक म्हणून काम केले होते. त्यांच्या विनतीनुसार ही बदली करण्यात आल्याचे समजते.
पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांची पूणे ग्रामीण मध्ये बदली












