कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्या मनमानी कारभाराविरोधात मनसे चे 15 फेब्रुवारी रोजी आंदोलन

कणकवली (प्रतिनिधी) : कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी मनसे शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मीडियाला दिलेले स्टेटमेंट शासकीय अधिकारी शिस्त व अपील नियमावली 1979 चा सर्वगोड यांनी भंग केला असून त्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली. रेल्वे स्टेशन सुशोभीकरण ची निविदा पनवेल मधील ठेकेदारांना दिली असून पि डी इन्फ्रा ह्या पनवेल च्या एजन्सी ला कामे दिली आहेत.सावंतवाडी स्टेशन चे काम के व्ही पाटील अँड कन्स्ट्रक्शन ला काम दिले. सिंगल टेंडर ला काम देताना फेरनिविदा होणे आवश्यक असते. मात्र तेही केले गेले नाही. रेल्वे स्टेशन सुशोभीकरण ची निविदा 3 कोटीहून अधिक असल्याने चीफ इंजिनियर कडे निविदा खोलने गरजेचे होते. मात्र सर्वगोड यांनी आपल्या दालनात ही टेंडर फोडून अधीक्षक अभियंता तिथे उपस्थित असल्याचे दाखवले. उपस्थितांमध्ये विभागीय लेखाधिकारी आणि सर्वगोड यांच्या सही आहेत. सर्वगोड टेंडर कसे मॅनेज करतात हे यावरून उघड होत असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला. कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचे कार्यक्षेत्र चार तालुक्याचे असूनही त्यांनी खेड चिपळूण, रत्नागिरी संगमेश्वर रेल्वे स्टेशन नूतनीकरण ची टेंडर कणकवली कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून कशी काढण्यात आली ? असा सवालही उपरकर यांनी केला. सिंधुदुर्ग चे अधीक्षक अभियंता कार्यालय सुरू झाल्या नंतर त्या पदाचा कार्यभार स्वतःकडे घेण्यासाठी सर्वगोड यांची खटपट असून अधीक्षक अभियंता पदाचा कार्यभार सर्वगोड याना घेऊ देणार नसल्याचे उपरकर म्हणाले. कार्यकारी अभियंता सर्वगोड हे मनमानी कारभार करत असून त्याविरोधात 15 फेब्रुवारी रोजी ठिय्या आंदोलन करणार असल्याचे उपरकर म्हणाले.

error: Content is protected !!