कणकवली ( आनंद तांबे ) : मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी नवजात कन्येच्या स्वागतासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कोळोशी गावचे सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी पुढचे पाऊल उचलत सरपंच पदाच्या मानधनातून गावातील नवजात कन्येच्या स्वागतासाठी रोख 1 हजार वृक्ष रोप आणि अभिनंदन पत्र पालकांच्या स्वाधीन केले.कल्पेश भोवर आणि प्रज्ञा भोवर दाम्पत्याला तसेच दर्शना इंदप आणि शैलेश इंदप दाम्पत्याला कन्यारत्न झाले.सरपंच आचरेकर यांनी ग्रामसेवक मंगेश राणे यांच्यासह इंदप आणि भोवर दाम्पत्याच्या घरी जात नवजात कनेच्या स्वागतासाठी वरील भेट स्वतःच्या सरपंच पदाच्या मानधनातून प्रदान केली. सरपंच गुरुनाथ आचरेकर यांच्या या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
नवजात कन्येला जन्मानंद भेट ; कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांचा आदर्शवत उपक्रम











