स्वामी समर्थ कलामंचाचे काम उल्लेखनीय !

कणकवली (प्रतिनिधी) : दातृत्वाची भावना सर्वांच्याच मनात असते परंतु काही माणसं मात्र चांगुलपणाच्या यशाच्या कौतुकासाठी नेहमीच पुढे असतात. याचच एक उदाहरण म्हणजे श्री स्वामी समर्थ कलामंच लोरे नं.२ ता. वैभववाडी यांच आहे.जि. प. केंद्रशाळा मणचे नं.१ ता. देवगड या शाळेचा खो-खो संघ जिल्हास्तरावर निवड झाल्याने श्री स्वामी समर्थ कलामंच चे लोरे नं.२ ता. वैभववाडी या ग्रुप कडून सदर संघाला प्रोत्साहन मिळण्यासाठी व कौतुकाची थाप म्हणून टी-शर्ट किटचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मणचे गावचे प्रथम नागरिक दीपक तोरस्कर, उपसरपंच मन्सूर सोलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सारिका रहाटे, तंटामुक्ती अध्यक्ष सहित सोलकर, केंद्रमुख्याध्यापक चिंतामणी पवार, रोशन मांडवकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या त्यांच्या कर्तृत्वाबद्दल संपूर्ण व्यासपीठावरील मान्यवर व ग्रामस्थांनी कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले. यावेळी या कला मंचाचे उपाध्यक्ष रोशनाली मांजलकर, सचिव रोशन मांडवकर, देवयानी मांजलकर, साधना मांजलकर, भावेश मांजलकर, अंकुश मांजलकर, ॲड.समीक्षा पवार, चंद्रिका पवार, संकेत पवार इत्यादी सभासद उपस्थित होते.

error: Content is protected !!