ओरोस (प्रतिनिधी) : अणाव पाटीलवाडी येथील आनंद पाटील (वय ४५) यांच्या विरोधात वाटेत अडवून मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांनी दिली. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी हा प्रकार अणाव पाटीलवाडी येथे घडला आहे. फिर्यादी सहदेव देवू चव्हाण, वय 55 वर्ष, वेताळ बांबार्डे हे आपल्या कामावर आलेल्या मजुरांना त्यांचे घरी सोडण्याकरिता आपल्या मोटरसायकलने गेले ते परत आपल्या घरी जात असताना ६ रोजी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी आरोपी यांनी फिर्यादी याचे मोटरसायकल अडवून त्याला आपल्या जमिनीतील झाडे का तोडली व त्याचे 75 हजार रुपये दे नाहीतर तुला ठार मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करून त्यांना हाताच्या थापटाने मारहाण केली. तसेच मोटरसायकल जाळण्यासाठी मुलाकरवी माचीस मागवण्यासाठी हाक दिली असता फिर्यादी सहदेव चव्हाण हे तेथून आपल्या मोटरसायकल निघून गेले. त्यानंतर त्यांनी याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे येऊन सांगितले. तसेच मेडिकल यादी घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ७ रोजी डिस्चार्ज झाल्यावर याबाबत पोलीस ठाणे येथे येऊन रीतसर फिर्याद दिली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाटेत अडवून मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अणाव येथील आनंद पाटील याच्यावर गुन्हा दाखल












