कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावचे ग्रामदैवत श्री देव काशिकलेश्वर मंदिरच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी विविध सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता लघुरुद्र होणार असून सायंकाळी 5 वाजता महिलांचे सुश्राव्य भजन होणार आहे. 6 वाजता कलमठ बिडयेवाडी चे सुश्राव्य भजन सादर होईल. सायंकाळी 7 वाजता समर्थ कलेश्वर ग्रुप कलमठ च्या वतीने स्वरसंध्या गितगायन केले जाणार आहे. रात्री साडे आठ वाजता विनोदी नाटिका सादर होणार असून रात्री साडेनऊ वाजता कालचक्र नाटक सादर होणार आहे.दुसऱ्या दिवशी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता धार्मिक विधी हवन होणार असून दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत महाप्रसाद वाटप होणार आहे.सायंकाळी 5 वाजता महाजनी नगर येथील महिलांचे सुश्राव्य भजन होईल. सायंकाळी 7 वाजता 51 पखवाज वादकांचा नाद तांडव सादर केले जाणार असून रात्री 9 नंतर कलमठ महिला मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहेत. भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान कमिटी च्या वतीने करण्यात आले आहे.
श्री देव काशिकलेश्वर मंदिर कलमठ च्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त सेवाभावी उपक्रम












