अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने वैभववाडीत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे सचिव अर्जुन रावराणे व कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांची उपस्थिती

सराव परीक्षांच्या सरावाने स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासक्रमाचा पाया भक्कम होण्यास मदत- जयेंद्र रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग आयोजित द स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग ॲवॉर्ड २०२४पुर्व उच्च प्राथमिक (इ.५ वी) शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन शुक्रवार दि.९-२-२०२४ रोजी अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे करण्यात आले होते. वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व सचिव अर्जुन रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिक्षेस प्रारंभ करण्यात आला. शिष्यवृत्ती सराव परिक्षांच्या सततच्या सरावाने विद्यार्थ्यांचा स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासक्रमाचा पाया भक्कम होण्यास मदत होईल असे मत यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले.

यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, सचिव अर्जुन रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा सल्लागार विजय आनंदा केळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुहास सिताराम कदम, जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र सदाशिव पाटील, तालुका अध्यक्ष संदीप जनार्दन शेळके, सचिव दत्तात्रय शांताराम माईनकर , केंद्र संचालक राजश्री नामदेव शेटे, तालुका उपाध्यक्ष पांडुरंग रामचंद्र कोकरे, उदय गोसावी सर, संजय चाफे सर, अरविंद चव्हाण सर, सागर पेंडूरकर सर, अमर पाटील सर, विलास हामु राठोड सर, शोभाताई केळकर मॅडम, लोरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अश्विनी मांडवकर आदी प्राथमिक शिक्षक व विद्यार्थी पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!