वैभववाडीत लोरे- राणेवाडी येथे भाजपचे गाव चलो अभियान

शासनाच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा- जयेंद्र रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : संपुर्ण राज्यभर भाजपाचे ‘गाव चलो अभियान ‘ सध्या सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातील लोरे राणेवाडी येथे प्रवासी कार्यकर्ता जयेंद्र रावराणे यांच्या निरीक्षणाखाली शक्ति केंद्रप्रमुख रितेश सुतार व बुथ अध्यक्ष भालचंद्र रावराणे यांच्या उपस्थितीत स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी लोरे राणेवाडी येथील ग्रामस्थांशी यावेळी संवाद साधला, केंद्र शासनाच्या योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी व लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांशी , गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते, आजी माजी लोकप्रतिनिधी ,गावातील शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत ग्रामसेवक, तलाठी , आशा सेविका व विविध योजना लाभार्थी यांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. गावातील तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या सर्व योजना लाभार्थ्यांना कशा पद्धतीने प्राप्त होतील याकडे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी लक्ष द्यावे असे आवाहन ‘गाव चलो अभियानातील ‘ प्रवासी कार्यकर्ते जयेंद्र रावराणे यांनी यावेळी केले.

‘गाव चलो अभियान ‘ दरम्यान शाळा, महिला बचतगट, निराधार महिला, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, स्थानिक देवस्थान कमिटी पदाधिकारी अशा सर्वांची भेट घेऊन शासनाच्या विविध योजना व लाभ याबद्दल चर्चा केली. सकाळी लोरे येथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जय भवानी जय शिवाजी..! वंदे मातरम् अशा घोषणा देत या गाव चलो अभियानाची सुरुवात झाली. गावातील काही ठिकाणी ‘ पुन्हा एकदा मोदी सरकार’ या आशयाचे भित्तीचित्रे रेखाटण्यात आली. ग्रामदैवत गांगोचाळा येथे कार्यकर्त्यांनी दर्शन घेऊन पुन्हा एकदा मोदी सरकार’ देशात यावे अशी इच्छा व्यक्त केली.

error: Content is protected !!