विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असलेल्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील ७२ खेड्यांतील १२९ देवांचे आराध्य व जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव कालभैरव या देवाचा यात्रोत्सव कार्यक्रम दी. १४ व १५ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार असून यानिमित्त विविध धार्मिक.कार्यक्रमासह सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री देव कालभैरव दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष श्री मधुकर शेठ गुरव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
खारेपाटण येथील श्री देव काल भैरव यात्रा दोन दिवस चालणार असून बुधवार दीं.१४ रोजी सकाळी ८.०० महारुद्र,दुपारी १२.३० वाजता आरती, दुपारी १.०० वाटप, सायं.४.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थिती सायं.७.०० वाजता पालखी प्रदिक्षणा रात्री ११.०० वाजता स्वरतन कुडाळ प्रस्तुत – सांज सुरांची गाण्यांची मैफिल हा संगीत कार्यक्रम सादर होणार आहे. तर गुरवार दि.१५ रोजी सकाळी ११.०० वाजल्या पासून प्रसाद वाटप, सायंकाळी ५.०० वाजता हरकुळ बुद्रुक येथील बुवा सुजित पवार व शिरवली येथील बुवा सागर मोहिते यांचा सुस्वर भजनांचा जंगी सामना रात्री ९.००० लहान मुलांचे विविध गुंणदर्षन कार्यक्रम रात्री ११.०० वाजता कोल्हापूर येथील ऑर्केस्ट्रा धमाका यांचा व्हरायटी शो व सामाजिक नाटीकेचे सादरीकारण होणार आहे.
तरी खारेपाटण येथील प्रसिद्ध अशा श्री देव कालभैरव जत्रे करिता जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष श्री देव कालभैरव – दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट व विश्वस्त तसेच श्री देव – दुर्गा देवी मंदिर जीर्णोद्धार कमिटी ,महिला साहय्यक कमिटी आणि बारा पाच वतनदार व ग्रामस्थ मंडळी खारेपाटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.












