शिरगाव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील चाफेड पिंपळवाडी येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलीप दाजी पाटील (५५ ) यांचे शुक्र. दि. 9 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिण, भावजय, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे. माजी ग्रामपंचायत सदस्या दीप्ती पाटील यांचे ते पती होत. दिलीप पाटील यांचा गावच्या, वाडीच्या विकासकामात खूप मोठा सहभाग असायचा. तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी भांडण तंट्यात प्रत्येकाला योग्य न्याय देण्याचे चांगले काम केले. गावच्या समाजकार्यात आणि विकासकामात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.












