नानेली विघ्नेश्वर मंदिर लाईट थ्री-फेज संदर्भात भाजपा नेते निलेश राणे यांची वचनपूर्ती

नानेली विघ्नेश्वर मंदिर थ्री-फेज लाइनची गेली दहा वर्षापासून होत असलेली मागणी अवघ्या तीन दिवसात पूर्ण

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील नानेली विघ्नेश्वर मंदिर येथे LT लाईन थ्री-फेज करण्याची मागणी अनेक वर्षे अनेक वर्षांपासून सुरू होती. स्थानिक आमदार यांनी दोन वेळा नानेली येथे येऊन सदरील काम पूर्ण करण्याची हमी दिली होती मात्र दोन्ही वेळा ग्रामस्थांची फसवणूक झाल्याने आतापर्यंत लो होल्टेज मध्येच माघी गणेशजयंती साजरी करण्याची वेळ नानेली ग्रामस्थ यांच्यावर होती. भारतीय जनता पक्षाचे गाव चलो अभियान सुरू असताना भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी नानेली येथे भेट दिली त्यावेळी आपण गेली दहा वर्षे सातत्याने मागणी करत आहोत मात्र हा प्रश्न सुटत असल्याची मगिती नानेली माजी सरपंच प्रमोद दळवी यांनी निलेश राणे यांना दिली. गणेशजयंती सोहळा अवघ्या चार दिवसांवर आला असून यावेळीही लो होल्टेज मध्येच श्री गणेश जयंती साजरी करायची वेळ आमच्यावर येऊ नये अशी अपेक्षा नानेली ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली होती. त्यानुसार माजी खासदार निलेश राणे यांनी तत्काळ या कामासाठी पाठपुरावा करत नानेली विघ्नेश्वर मंदिर येथे लाईन थ्री-फेज करण्यासंदर्भात निधीची तरतूद केली. आज नानेली विघ्नेश्वर मंदिर येथील लाईन थ्री-फेज करायचं काम पूर्ण झालं अजून अवघ्या तीन दिवसात हा प्रश्न निकाली निघाला आहे. सदरील काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी माजी सभापती मोहन सावंत, प्रकाश पावसकर यांनी मेहनत घेऊन हे काम दिलेल्या वेळेत पूर्ण केले आहे. या बाबत नानेली विद्यमान सरपंच वंदना धुरी, माजी सरपंच प्रमोद दळवी, मंदिर पुजारी घाडी व नानेली ग्रामस्थ यांनी निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!