कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या पोचला व्हरांड्यात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील सांगवे कनेडी येथील माळरानावर संभाजी नगर येथे सुनील दौलतराव सावंत. यांच्या घरी रविवार दिनांक 11फेब्रुवारी रोजी मध्य रात्री 1च्या सुमारास बिबट्या वाघ कुत्र्याचा पाठलाग करीत व्हरांड्यात येऊन गेला.कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून मुकेश सावंत यांनी दरवाजा उघडताच बिबट्या ने समोरच्या माडातील बागेतून पलायन केले. समोरील घरामध्ये राहात असलेले वन खात्यातील वनरक्षक मणेर यांना लगेच संपर्क साधण्यात आला. त्यांनी बागेतल्या पावलांचे निरीक्षण केले असता बिबट्या वाघ याची च पाऊले असल्याची खात्री केली. कनेडी बाजारपेठ नजीकच्या मणुष्य वस्तीच्या परिसरात बिबट्या वाघ संचार करीत असल्या मुळे नागरिकांत भीतीमय वातावरण निर्माण होऊन चिंता व्यक्त केली जात आहे. तरी त्वरीत वन खात्याने बिबट्या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

error: Content is protected !!