समानवता ट्रस्टच्या वतीने महिलांसाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण

मराठी सिनेकलाकार अक्षता कांबळी यांच्या हस्ते उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : महिलांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन रोजगार क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून समानवता ट्रस्ट सिंधुदुर्गच्या वतीने मोफत शिलाई मशीन प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणाच्या पहिल्या बॅचचे उद्घाटन मराठी सिने कलाकार अक्षता कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबईचे उद्योजक मिलिंद राव समानवता ट्रस्टचे सचिव कमलेश गोसावी संचालक नितीन तळेकर संचालिका कविता गोसावी प्रशिक्षण मार्गदर्शक रश्मी दाभोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला शुभेच्छा देताना उद्घाटक अक्षता कांबळी यांनी महिलांना मार्गदर्शन केले. महिलांच्या जीवनात संघर्ष असला तरी महिलांनी जिद्द सोडू नये, जिद्दीच्या जोरावर आणि कठोर परिश्रमाने जीवन सफल बनवण्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव कमलेश गोसावी यांनी केले. अशा प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात घेण्याचा मानस त्यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केला.

error: Content is protected !!