श्री मोरेश्वर गणपती मंदिर धामापूर येथे माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन.

चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील धामापूर सड्यावरील प्रसिद्ध देवस्थान श्री देव गणपती मंदिर येथे मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सलग सहाव्या वर्षी माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

त्यानिमित्ताने सकाळी ६.०० वाजता श्री देव मोरेश्वर अभिषेक पूजा , सकाळी ८.०० वाजता दर्शन आणि नवस फेडण्यास सुरुवात , दुपारी १२.३० वाजता महाआरती ,दुपारी १.०० वाजता महाप्रसाद , दुपारी २ ते ४ वा. महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम , संध्याकाळी ४ वाजल्यापासून स्थानिक भजने , रात्रौ ७.३० वाजता वारकरी दिंडी भजन कार्यक्रम , रात्रौ ९ .०० वाजता मान्यवरांचा सत्कार, आणि रात्रौ १०.३० वाजता दशावतार नाट्यमंडळ आरोस यांचा ” जय हनुमान ” हा महापौराणीक नाट्यप्रयोग अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी या उत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!