राज्यस्तरीय एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत व शिष्यवृत्ती सराव परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल चे उज्वल यश

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने वैभववाडीत आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत आयुष नाळे तालुक्यात प्रथम

वैभववाडी (प्रतिनिधी) : राज्यस्तरीय एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी च्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले या परीक्षेत खुल्या गटातून सोहम दत्तात्रय पाटील तर ओ बी सी गटातून चंदना परशुराम गुरव व चेतन परशुराम गुरव या भावंडांनी यश संपादन केले.तर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने वैभववाडीत आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षेत विद्यालयाच्या आयुष नाळे , फिजा आरवाडे, अनुष्का हावळ, स्वरांजली पवार, शौर्य बोडेकर,हर्ष दिघे, विहंग वरक, ओम शिंदे, वेदांत सरकटे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. आयुष नाळे याने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे या बद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!