नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसमेलन उत्साहात संपन्न

अभिनेता हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षरा देवधर यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाला आली रंगत

खारेपाटण (प्रतिनिधी) : आदर्श एज्युकेशन सोसायटी खारेपाटण संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे या माध्यमिक शाळेचे सन २०२३ – २४ या शैशाणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसमेलन कार्यक्रम नुकताच खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या भव्य पटांगणावर संपन्न झाला. तर या कार्यक्रमाला खास आकर्षण असलेल्या अभिनेता हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षरा देवधर – जोशी यांच्या उपस्थितीने स्नेसंमेलन कार्यक्रमाला रंगत आली.

नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल चे अध्यक्ष मनोज गुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला मुंबई येथील पोलिस अधिकारी कांतीलाल कोथिंबीरे, तसेच इंस्ट्राग्राम व यू ट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध असलेले ऑरेंज ज्यूस गँगचे प्रमुख नील सालेकर व सहकारी कलाकार सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे, शुभम जाधव, श्रवण शिरसागर, किरण सोनावणे, उपस्थित होते. याबरोबरच संस्थेचे सचिव मोहन कावळे, कार्यवाह राजेंद्र ब्रम्हदंडे, संचालक परवेज पटेल, रघुवीर राणे, विजय कळत्रे, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, श्री देव कालभैरव – दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट खारेपाटण चे अध्यक्ष मधुकर शेठ गुरव, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

” जाऊ बाई गावात” या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही शहरातील मुलींना गावाकडे घेऊन आलो. मात्र तुम्ही तर आमच्या पेक्षाही कितीतरी मोठे असे शिक्षण शेत्रातील काम करत असून “आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा व उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घेऊन जात आहात परदेशात”. असे भावपूर्ण उदगार अभिनेता हार्दिक जोशी यांनी स्नेहसमेलन कार्यक्रमात बोलताना काढले. यावेळी अभिनेत्री अक्षरा देवधर – जोशी हिने देखील खारेपाटण हे माझे मूळ गाव असल्याचे आपल्या भाषणात आवर्जुन उल्लेख करत एवढ्या ग्रामीण भगात सुंदर, पवित्र व महाण असे शिक्षण सारखे कार्य मनोज दादा गुळेकर यांचेकडून घडतं आहे. याचा मला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले मुंबई पोलीस अधिकारी कांतीलाल कोथिंबीरे यांनी शालेय विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. मुलं घडविण्याचे कार्य जेवढे शिक्षकांचे आहे. त्यापेक्षा कितीतरी पटीने पालक म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे. तुमच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची पुस्तके वाचायला द्या. ज्या दिवशी पालक म्हणून जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडाल त्यादिवसापसून तुमची मुले योग्य वाटेवर चालताना तुम्हाला दिसतील. असे प्रतिपादन पोलीस अधिकारी कांतीलाल कोथिंबिरे यांनी यावेळी केले.

संस्थेचे अध्यक्ष मनोज गुलेकर यांच्या शुभहस्ते मान्यवर अभिनेते हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षरा देवधर यांसह पोलीस अधिकारी कांतीलाल कोथिंबीर साहेब, ऑरेंज ज्यूस गँग चे प्रमुख नील सालेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेचे गुणवंत विद्यार्थी उजेंर मुकादम, महेक मुकादम, नील लोकरे, जिदान सारंग, सुजल महातो, महविश मुल्ला तर इयत्ता १० वी २०२३ परीक्षेत प्रथम आलेला शालेय विद्यार्थी शुभंकर कुबल या सर्वांचा उपस्थित मान्यवरांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ज्युनिअर के जी ते दहावी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्तविक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निता शुक्ला यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तुभ देसाई सर व ओंकार गाडगीळ यांनी केले. तर सर्वांचे आभार विद्यालयाच्या प्राचार्य नीलम डांगे यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पालकांची व नागरिकांची गर्दी होती.

error: Content is protected !!