तेलीसाहेब युतीधर्म पाळा ; बहिष्कार घालणे चुकीचे

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांचा सल्ला

कुडाळ (प्रतिनिधी) : दीपक केसरकर यांना जागा दाखवण्याची भाषा करण्यापेक्षा माजी आमदार राजन तेली यांनी युती धर्म पाळावा, असा सल्ला शिवसेना संघटक रुपेश पावसकर यांनी दिला आहे. आपण दोघे मित्र पक्षातील आहोत. त्यामुळे आपली एकजूट विरोधकांना तडीपार करणारी ठरावी, बहिष्काराचा निर्णय योग्य नाही, हेवे-दावे बाजूला ठेवून एकत्र काम करूया, असे ही त्यांनी आवाहन केले आहे.

सावंतवाडीतील विकास कामाचे उद्घाटन केल्याच्या कारणावरून केसरकर व तेली यांच्यात जोरदार जुगलबंदी रंगली आहे. या पार्श्वभूमीवर काल तेली यांनी केसरकर यांना जनताच जागा दाखवेल, असे वक्तव्य केले होते. याला पावसकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.ते म्हणाले, केसरकर कायम युती धर्म पाळतात म्हणून कालच्या कार्यक्रमात सर्व पदाधिकाऱ्यांना आमंत्रण देण्यात आले होते. परंतु राज्याची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री महोदय हे सकाळ ऐवजी दुपारी उपलब्ध झाल्यामुळे नियोजित कार्यक्रमाला वेळ लागला. त्यामुळे या गोष्टीवरून आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा तेलींनी एकत्र येऊन कार्यक्रम करावे. कार्यक्रमावर बहिष्कार योग्य नाही, हेवे दावे बाजूला ठेवून विकासाची गंगा असे ही त्यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

error: Content is protected !!