खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये इयत्ता बारावी विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ नुकताच शाळेच्या कै.चंद्रकांत परिसा रयबागकर सभागृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय ख्यातनाम दंतचिकित्सक डॉक्टर स्वप्नील राणे हे उपस्थित होते.खारेपाटण कॉलेज इयत्ता बारावी मध्ये सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षांमध्ये एकुण ३०० विद्यार्थी शिक्षण घेत होते. या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभ कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेश कोळसुलकर उपस्थित होते.तर संस्थेचे खजिनदार संदेश धुमाळे, संचालक विजय देसाई, खारेपाटण प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आत्माराम कांबळे आदी मान्यवर यावेळी पस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे जेष्ठ शिक्षक लक्ष्मीकांत हरयाण यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. तर ज्येष्ठ शिक्षक दयानंद कोकाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यानंतर अकरावीच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले दोन वर्षातील विविध अनुभव कथन केले.मान्यवरांच्या मार्गदर्शना मध्ये प्रशालेचे पर्यवेक्षक संतोष राऊत, सीनियर कॉलेज प्राचार्य आत्माराम कांबळे, मंगेश गुरव, संचालक विजय देसाई, सहायक शिक्षक जगदीश सावंत, सहायक शिक्षक अजय गुरसाळे यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यामध्ये आपण कसे घडावे, याबाबत मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे डॉक्टर स्वप्नील राणे यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यामध्ये स्पर्धात्मक युगामध्ये कशा पद्धतीने आपण सामोरे जावे याबाबत मार्गदर्शन केले, तसेच आपल्या आयुष्याची दिशा आजच निश्चित करा अशा पद्धतीचे मार्गदर्शन केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महेश कोळसुलकर यांनी विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक शिक्षक सचिन शेट्ये यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांनी केले.
















