कणकवली (प्रतिनिधी) : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष नाईक यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांचे शुभेच्छा पत्रातून अभिनंदन केले आहे.
सदर शुभेच्छा पत्रात म्हटले आहे की कोकण विभागात नाईक यांनी संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदाची यशस्वी धुरा सांभाळली. संघटनेच्या कार्यासाठी दिलेले भरीव योगदान आणि सातत्यपूर्ण व कामगिरी व लक्षात घेऊन त्यांची सलग तिस-यांदा फेरनिवड करण्यात आली ही नक्कीच आनंदाची बाब आहे.
मानवी हक्क व संरक्षण तत्त्वांची माहिती तळागाळातील सर्व जनतेपर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा व्यक्त करत संतोष नाईक अपेक्षा व्यक्त केली आहे.













