विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
चौके (अमोल गोसावी) : श्री देवी माऊली मंदिर काळसे मंदिराचा प्रथम वर्धापनदिन सोहळा गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यानिमित्त श्री देवी माऊली मंदिर जीर्णोद्धार समिती मुंबई व श्री देवी माऊली मंदिर व्यवस्थापन समिती काळसे यांच्यावतीने विविध धार्मिक , सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त गुरुवारी सकाळी ८ ते १२.३० वा. वझे गुरुजी व इतर पुरोहितांच्या हस्ते विविध धार्मिक कार्यक्रम होम हवन व अनुष्ठान विधी होणार आहेत. दुपारी १ वाजता पुर्णाहुती अवभ्रूताभिषेक महानैवेद्य व आरती. दुपारी १.३० ते ३.३० महाप्रसाद , दुपारी १.३० वाजता ” स्वर क्षितिज ” म्युझिकल ग्रूप पेंडूर यांचा “दिनांची माऊली ” हा अभंगवाणी कार्यक्रम., सायं. ६ वाजता स्थानिक भजन , सायं. ७ वाजता बुवा वैभव सावंत यांचे सदगुरु संगीत भजन मंडळाचे सुश्राव्य भजन , रात्रौ. ८ वा. प. पु. राऊळ महाराज भजन मंडळ पिंगुळी बुवा मयूर पिंगुळकर यांचे संगीत भजन, आणि रात्रौ ९.३० वाजता शक्ती दशावतार नाट्यमंडळ काळसे यांचा ” पाठलाग ” हा ट्रिकसीन युक्त दशावतारी नाट्यप्रयोग साद होणार आहे. अशा प्रकारे दिवसभर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून भाविक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.