शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे (शिंदे सेना) मित्रमंडळ यांच्यावतीने आचरा तिठा येथे साजरा होणार शिवजन्मोत्सव सोहळा..!

डबलबारीचा सामना विशेष आकर्षण-बुवा श्रीकांत शिरसाठ व बुवा प्रथमेश चव्हाण यांच्यात रंगणार सामना

उद्योजक किरण उर्फ भैया सामंत, बिग्रेडियर सुधिर सावंत, माजी खासदार निलेश राणे, जिल्हा प्रमुख संजय आग्रे, महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुका प्रमुख महेश राणे, आचरा सरपंच जेरोन फर्नांडीस यांची प्रमुख उपस्थिती

आचरा (विवेक परब) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मालवण तालुक्यातील आचरा तिठा येथे सॊमवार 19 फेब्रुवारी रोजी शिवसेना (शिंदे सेना) पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन, सकाळी 10. 30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांनवर आधारित संदेश रावले प्रस्तुत-स्वरसंदेश कराओके म्युझियम शो-त्रिबंक-, सकाळी 11 वाजता आचरा मतदार संघातील आरोग्य सेविका व आशा सेविका यांचा सत्कार सोहळा, सकाळी 11 .30 वाजता आचरा मतदार संघातील प्राण्याच्या आयुर्वेदीक वैद यांचा सत्कार सोहळा, रात्रौ 8 वाजता आचरा मतदार संघातील भजनी बुवांचा सत्कार सोहळा, रात्रौ 8. 30 वाजता- पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा, रात्रौ10 वाजता कार्यक्रमाचे विशेष आकर्षण डबलबारीचा जंगी सामना- बुवा श्रीकांत शिरसाठ विरुद्ध बुवा प्रथमेश चव्हाण रंगणार आहे.

या सोहळ्याला उद्योजक श्री. किरण उर्फ भैया सामंत, बिग्रेडियर माजी खासदार सुधिर सावंत, माजी खासदार निलेश राणे, जिल्हा प्रमुख श्री. संजय आग्रे, महिला जिल्हा प्रमुख वर्षाताई कुडाळकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुका प्रमुख महेश राणे, आचरा सरपंच जॅरोन फर्नाडीस उपस्थित राहणार आहेत. तरी शिवभक्त, शिवसैनिक, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला, ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!