कणकवली (प्रतिनिधी) : उद्या दिनांक 19 रोजी कणकवली शहर शिवसेना तर्फे शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सकाळी 9:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख प्रमोद शेठ मसुरकर यांनी केलेले आहे . तसेच सायंकाळी 4:00ते 6:00 वाजता हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेले आहे. गांगोवाडी,टेंबवाडी,बाजारपेठ आणि सोनगेवाडी या वार्डाचा हळदीकुंकु समारंभ आयोजित केलेला आहे.असे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महिला जिल्हाप्रमुख सौ.निलम ताई पालव , दिव्या साळगावकर साक्षी आमडोस्कर यांनी केलेले आहे.आणि रात्री सुस्वर भजनांचा कार्येक्रम आयोजित केलेला आहे.
कणकवलीत शिवसेना ठाकरे गट च्या वतीने साजरी होणार शिवजयंती












