ओबीसी समाज कणकवली च्या वतीने शिवजयंती निमित्त निघणार भव्य बाईक रॅली

कणकवली (प्रतिनिधी) : ओबीसी समाज कणकवली च्या वतीने उद्या शिवजयंती निमित्त भव्य बाईक रॅलीचे नियोजन करण्यात आले आहे. ही बाईक रॅली पटवर्धन चौक कणकवली येथून सायंकाळी ठीक चार वाजता निघणार आहे रॅलीचा मार्ग पटवर्धन चौक मार्गे बाजारपेठ शिवाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मानवंदना तेथून सरकारी हॉस्पिटल मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दाखल होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समाप्त होईल यानिमित्ताने ओबीसी समाज च्या वतीने असे आवाहन करण्यात येते की सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने पटवर्धन चौक येथे सायंकाळी ठीक 4 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

error: Content is protected !!