खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उस्ताहात साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तथा शिवकन्या अन्वी शिंदे, सांची पाटणकर, काव्या कासार, स्वरा कासार, खुशी मेवाडा, गार्गी लोकरे याच्या शुभहस्ते शिवप्रतीमेचे पूजन करण्यात आले. तर शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या हस्ते शिवप्रतीमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिव इतिहासवर छान भाषणे सादर केली.या कार्यक्रमाला शाळेच्या शिक्षिका रेखा लांघी, अलका मोरे, रुपाली पारकर, आरती जेजोन, स्मिता कोरगावकर, सहदेव कोंडविलकर, अबिदा काझी, अमृता ब्रम्हदंडे आदी मान्यवर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.












