हळवल उपसरपंचपदी भाजपा पुरस्कृत प्रभाकर राणे यांची निवड

ठाकरे गटाच्या अनंत राणेंचा 6 विरुद्ध 4 मतांनी केला पराभव

कणकवली (प्रतिनिधी) : हळवल ग्रामपंचायत मध्ये रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी नुकतीच निवडणुक प्रक्रिया घेण्यात आली. यात भाजपा पुरस्कृत उमेदवार प्रभाकर राणे आणि उबाठा पुरस्कृत उमेदवार अनंत राणे हे निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत प्रभाकर राणे हे 6 मते घेऊन विजयी झाले तर अनंत राणे यांना 4 मते मिळाली, त्यावेळी उपस्थितानी प्रभाकर राणे यांचे अभिनंदन केले, त्यावेळी उपस्थित, सरपंच अपर्णा चव्हाण, शशिकांत राणे, संतोष गुरव, प्रदिप गावडे, शिवा राणे, सुदर्शन राणे सचिन ठाकूर सानवी गावडे, रसिका गुरव, भारती तांबे, अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!