वैभववाडी (प्रतिनिधी) : भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्हिडीओ शूटिंग करणाऱ्या पोलिसांबद्दल जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यावरून पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नीनी त्याची लेखी पत्रातून तक्रार केली होती.त्यावरून आमदार निटेध राणे यांनी त्या पत्राला पत्राद्वारे उत्तर देणार असे म्हटले आहे. आमदार नितेश राणेंचा समाचार घेताना माजी पोलीस अधिकारी असलेले श्री संदीप सरवणकर माध्यमांना सांगताना म्हणाले आहेत की, “राज्यात कायदा हा कोणीच मानायला तयार नाही. वकील , डॉक्टर , सरकारी नोकर, ,मित्र तसेच विरोधी पक्ष यांचे नेत्यावर हल्ले होत आहेत. सत्ताधारी बंदूकधारी पोलिस ठाणे फैरी धाडत आहेत.धार्मिक तेढ जोपासली जात आहे. करोडोचे ड्रग्सचे कारखाने पुणे ठाणे संस्कृती शहरात सापडत आहेत .जणू राज्यभर अराजकता पसरली आहे.असे वातावरणात असताना, पोलिस अहोरात्र आपले कर्तव्य प्रमाणिक करीत आहेत.म्हणून तरी, दंगल सदृश्य काही घडत नाही आहे. परंतु आपणच सत्ताधारी असून , आपल्याच पक्षातील राणे कुटुंबिय हे , श्री शंकराचार्य , हिंदु हृद्य सम्राट बाळा साहेबांचे परिवारातील सदस्य पासून ते पोलिसांचे कुटुंबा पर्यंत त्याचे तोंडात येईल ते बरळत आहेत. त्या मुळे लोकांचे भावना ही भडकत आहेत .हे गृहमंत्र्यानी समजून घेणे आवश्यक होते .आता तर अकोल्यात जाहीर सभेत आमदार नितेश राणे, यांनी सत्तेचा हवाला देतच, केवळ पोलिसांनी त्याचे सभेचे चित्रीकरण केले म्हणून त्यांचे पत्नी बाबत “त्यांना हे फारतर चित्रीकरण नेवुन दाखवतील’,असे बेताल विधान केले आहे. त्या मुळे पोलीस दलात संतापाची लाट आलेली दिसत आहे. त्यांचे खच्चीकरण होऊ नये म्हणून, एका पोलीस सुविद्य पत्नीने माननीय आयुक्तना तक्रारपत्र दिले आहे.त्याला उत्तर म्हणून हे आमदार , त्या पत्नींनाच पत्र लिहणार असे, मिडिया द्वारे सांगताना दिसत आहेत.त्यात सुद्धा त्यांचा उद्दाम पणा जास्त दिसत आहे. खरतर त्यांनी पत्र नाहीतर , आपल्या विधानाचा पश्छताप होतो, म्हणून माफीनामा द्यायला पाहिजे.पण एवढी संस्कृती त्यांना पचनार नाही , असे दिसते आहे.म्हणून ते उद्दाम बोलताना अनेकवेळा ज्यांचे नावाचा ते “बॉस ” म्हणून दाखला देतात, त्यांचा तरीदेखील हसतमुख चेहराच, हे पाहून नितेश राणेंना अजून बळ मिळाल्या सारखं झाले आहे ,त्या सागर बंगलाधिपतीनी आता राजीनामा द्यावा, ही वेळ आता येवून ठेपलीं आहे’.असा टोला ही संदीप सरवणकर यांनी दिला .
आमदार नितेश राणे पोलिस वहिनींना पत्र नको माफीनामा द्या,नाहीतर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा- संदीप सरवणकर












