माधवबाग कुडाळ व धामापूर ग्रामपंचायतचे यशस्वी आयोजन
चौके (अमोल गोसावी) : रविवारी धामापूर येथे माधवबाग कुडाळ आणि ग्रामपंचायत धामापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय धामापूर येथे आयोजित हृदयरोग, ब्लॉकेजीस, डायबेटिस, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा , थायरॉइड, सांध्यांचे आजार असलेल्या रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी परिसरातील ३४ जणांनी तपासणी करून शिबीराचा लाभ घेतला. यावेळी डॉ. अमेय पाटकर , धामापूर सरपंच सौ. मानसी परब , उपसरपंच रमेश निवतकर, ग्रा.प. सदस्य स्वप्निल नाईक, तेजस्विनी भोसले, अस्मिता फोपळे, प्रशांत गावडे, ग्रामसेवक प्रणयकुमार पेडणेकर माजी सरपंच ज्ञानेश्वर परब आणि ग्रामस्थ उपस्थित होते.