बाबू इलेव्हन सागवे संघ अंतिम विजेता तर गांगेश्वर तळेरे संघ उपविजेता
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील श्री देव केदारेश्वर मित्र मंडळ आयोजित टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत बाबू इलेव्हन संघ सागवे, ता.राजापुर हा संघ अंतिम विजेता ठरला असून या संघाला रोख रुपये २५,५५५/- रुपये व आकर्षक चषक तर उपविजेता गांगेश्वर, तळेरे ता. कणकवली या संघाला रोख रुपये १५,५५५/- रुपये व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
या क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला माजी जि.प. बांधकाम व वित्त सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार, खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, माजी सरपंच रमाकांत राऊत, सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई, भाऊ राणे, निखिल गुरव, संतोष पाटणकर, संकेत शेट्ये, दिगंबर राऊत, ग्रा.पं. सदस्य जयदीप देसाई, किरण कर्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
खारेपाटण येथील केदारेश्वर मैदानवर सलग तीन दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३२ संघांनी सहभाग घेतला होता. या क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बाबू इलेव्हन संघाचा खेळाडू सिद्धार्थ नार्वेकर याला रमाकांत राऊत यांच्या शूभहस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून गांगेश्वर तळेरे
संघाचा खेळाडू चंद्रकांत जाधव याला भाऊ राणे यांच्या शुभहस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.याबरोबरच उत्कृष्ट शेत्ररक्षक म्हणून गांगेश्वर तळेरे संघाचा खेळाडू भूषण तळेकर याला विजय देसाई यांच्या शुभहस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.तसेच सामन्याचा मालिकावीर म्हणून बाबू इलेव्हन संघाचा खेळाडू सिद्धार्थ नार्वेकर याला संकेत शेट्ये यांच्या शुभहस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.
या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम विजेता संघ बाबू इलेव्हन सागवे संघ याला रवींद्र जठार व निखिल गुरव यांच्या शुभहस्ते प्रथम क्रमांकाचा चषक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.तर उपविजेता गांगेश्वर संघाला खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर व उपसरपंच महेंद्र गुरव यांच्या शुभहस्ते द्वितीय क्रमांकाचा चषक व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे मंडळाचे कार्यकर्ते भाऊ राणे यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेला विजय देसाई, रमाकांत राऊत, सरपंच प्राची ईसवलकर यांनी शुभेच्छा दिल्या. तर प्रमुख पाहुणे रवींद्र जठार यांनी केदारेश्वर क्रिकेट मंडळाचे कौतुक करून क्रिकेट बरोबरच या मंडळाने सामाजिक उपक्रम देखील राबवावेत असे आवाहन केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खारेपाटण केदारेश्वर मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


















