जि. प. शाळा कलमठ गावडेवाडी येथे मराठी राजभाषा दिन साजरा
कणकवली (प्रतिनिधी) : मराठी केवळ आपल्यासाठी भाषा नसून वात्सल्याचे, ममतेचे बोल आहेत. एवढी सामर्थ्यवान माझी मराठी भाषा आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलमठ गावडेवाडी ,तालुका -कणकवली येथे आज मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन. त्यांच्या स्मृतीस वंदन करून त्यांच्याच कवितेने आजच्या कविता वाचनाची सुरुवात झाली. मुख्याध्यापिका रश्मी आंगणे यांनी मराठी भाषेची थोरवी,महत्त्व विशद केले.कवी कुसुमाग्रजांच्या गाभारा या कवितेचे वाचन केले .त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येकी एका कवितेचे वाचन केले. शिक्षिका शितल गोवेकर यांनी ‘ पाणीदार डोळ्यांची मुलगी’ ही कविता तर रश्मी आंगणे यांनी ‘ तुझ्याविना हे कसे जमावे ‘ ही स्वरचित कविता सादर केली. शेवटी ” वेडात मराठे वीर दौडले सात ” या गीत गायनाने या कार्यक्रमाचा समारोप झाला.











