वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे-वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील दत्तमंदिर शाळा क्रमांक १, विद्यामंदिर वाभवे प्राथमिक शाळा तसेच सर्व अंगणवाडी शाळांमधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शालेय साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम माजी नगरसेवक संताजी अरविंद रावराणे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी नगरसेवक संताजी रावराणे, ॲड.भाविका संताजी रावराणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तेजस साळुंखे, सुषमा दळवी, समिधा शिंदे, संगीता चव्हाण, गौतमी कळसुलकर, शितल टकले तसेच बहुसंख्य पालक उपस्थित होते.
तसेच मुख्याध्यापक दिनकर केळकर, रेखा धावले, अहिल्या लांडगे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमाला सहकार्य केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप झाल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.












