कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ओसरगाव भारतीय जनता पक्षाच्यावतीने वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप आणि खाऊवाटपासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री मा. ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ओसरगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी खाऊवाटपाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या उपक्रमात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.












