कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी घेताहेत कुक्कुटपालनाचे धडे

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी अनुभवातून शिक्षण उपक्रम या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी कुक्कुट संगोपनाचे शिक्षण घेत आहेत. आपल्या राज्यात शेतकरी हा फक्त शेतीवरच अवलंबून आहे. यातून शेतकऱ्याला पूर्ण वर्षभर रोजगार मिळत नाही.या समस्येवर मात करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध होण्यासाठी या उपक्रमाचा फायदा होणार आहे. या उपक्रमात विद्यार्थी मांसल कोंबड्या आणि अंडी देणाऱ्या कोंबड्या यांचे संगोपन कसे करावे याचे शिक्षण घेत आहेत. यामध्ये पक्षांच्या निवारा , शेडची स्वच्छता , निर्जंतुकिकरण कसे करावे, पक्षी येण्याअगोदर शेड कसे तयार करावे, पक्षांचे खाद्य आणि पाणी व्यवस्थापन, आजारांपासून संरक्षण होण्यासाठी लसीकरण कसे करावे, पक्षांचे ब्रूडींग, चोची कापणे,पूर्ण वाढ झालेल्या पक्षांची विक्री आणि विपणन कशा पद्धतीने करावे याचे शिक्षण घेत आहेत.

सदर उपक्रमात अंतिम वर्षातील प्रतीक पाटील, ऋषी परिट, साहिल पाटील, प्रज्योत माने, प्रथमेश नागरगोजे, कुलदीप पवार, योगेश प्रभू, अंजली पाटील, श्रेया पाटील, अंजली माळी, सायली पवार, समीक्षा मांडवकर, पियुषा मांजरेकर, प्रगती पाटील,कीर्ती पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दर्शना कदम, विषय शिक्षक एस. एस. मोटे, प्राध्यापक पियुष शिर्के आणि भाग्यश्री साटम यांनी मार्गदर्शन केले आहे. सदर उपक्रम राबविण्यासाठी ब्राम्हणेश्वर शैक्षणिक व सामाजिक उन्नतीमंडळ या संस्थेचे अध्यक्ष दिपेश मराठे, मिताली मराठे आणि विद्या राणे पाटील मॅडम यांचे सहकार्य लाभले आहे.

error: Content is protected !!