कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी,तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी, बालमंदिर कनेडी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले.
चित्रदुर्गा कर्नाटका इंटरनॅशनल चिंथना अँड नवोदय कॉम्पिटिशन या संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेत बालमंदिर कनेडी या शाळेतील बालवाडी व इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे एकूण अठरा विद्यार्थी प्रविष्ट झाले.या स्पर्धेत जिल्हास्तरावर सात विद्यार्थी यशस्वी झाले.
चित्रकला परीक्षा- बालवाडी- कु. श्रावी संदिप चांदोस्कर,गणित परीक्षा- बालवाडी- कु. रिद्धी मंगेश सावंत, इयत्ता पहिली- कु. दुर्वांक सिद्धेश राणे,सायन्स परीक्षा- इयत्ता तिसरी- कु. आभास भिवा कोरडे, जनरल नॉलेज- इयत्ता पहिली- कु. शिव कैलास सावंत, इंग्रजी ग्रामर- इयत्ता दुसरी- कु. माही सतीश घाडीगांवकर, इयत्ता -चौथी कु. गंधर्व जनार्दन जाधव या सर्व विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले.
या नेत्रदिपक सुयशाबद्दल सतीश सावंत (अध्यक्ष,क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबई) आर.एच.सावंत, (शालेय समिती चेअरमन), संस्थेचे सर्व पदाधिकारी, बालमंदिर कनेडीच्या मुख्याध्यापिका ग्रेसी चोडणेकर, माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी,पर्यवेक्षक बयाजी बुराण, तसेच प्रशालेतील मार्गदर्शक सहाय्यक शिक्षिका रूबी घोन्सालवीस शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.