धामापूर तलाव परीसरात वॉटर एटीएम चा शुभारंभ
चौके ( प्रतिनिधी ) : जगप्रसिद्ध निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या धामापूर तलाव परीसरात श्री देवी भगवती मंदिरासमोर याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी नुकताच वॉटर एटीम सेवेचा शुभारंभ मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी कृषी अधिकारी संजय गोसावी , विस्तार अधिकारी सुनिल चव्हाण , धामापूर सरपंच मानसी परब , उपसरपंच रमेश निवतकर , सदस्य प्रशांत गावडे , तेजस्विनी धामापूरकर , स्वप्निल नाईक , साक्षी नाईक, ग्रामसेवक प्रणयकुमार पेडणेकर , उद्योजक महेश परब , सामाजिक कार्यकर्ते प्रताप चव्हाण आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या वॉटर एटीएम मध्ये ५ रुपयाचा कॉईन टाकल्यावर पाणी शुद्धीकरण प्लॅंट मध्ये फिल्टर होऊन शुद्ध झालेले एक लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटक व भाविकांची अल्प किंमतीत पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय होणार आहे या साठी १५ व्या वीत्त आयोगातून निधीची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती धामापूर सरपंच मानसी परब यांनी यावेळी दिली.